चिरनेर गावात नवीन रंगमंचाची उभारणी

। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर गावाला नाट्यकलेची समृद्ध परंपरा लाभली आहे. चिरनेर हे गाव नाटक वेडे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात 5 ते 6 पिढ्यांपासून नाट्य कला सादर केले जाते. खूप वर्षापूर्वी येथे रंगमंचाची उभारणी करण्यात आली होती, पण हा रंगमंच मोडकळीस व जीर्ण झाल्याने तो पाडून त्या ठिकाणी नवीन रंगमंच उभारण्यात येणार आहे. या रंगमंचाचे कामकाज सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन ग्रीन लँड डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर मोकल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. 42 बाय 31 असा भव्य रंगमंच उभारला जाणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 17 लाखांचा जिल्हा निधी या रंगमंचाच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. रंगमंच्या उभारणीत मेकअपसाठी दोन खोल्या देखील काढण्यात आले आहेत.

Exit mobile version