• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

ग्राहकांची फसवणूक आणि सुरक्षा उपाय

Varsha Mehata by Varsha Mehata
December 23, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
0
SHARES
92
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डॉ. प्रितम भी. गेडाम

आजकाल ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड आहे. आपल्याला इंटरनेटद्वारे सर्व काही झटपट मिळते, परंतु आता बनावट वेबसाइटचे जाळे सगळीकडे पसरले आहे, ऑनलाइन फसवणूकीत प्रचंड वाढ झाली आहे. ग्राहक फसवले जात आहेत. याच समस्येबाबत ग्राहकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.

सर्च इंजिनवरून कोणत्याही प्रकारचे उत्पादन किंवा वस्तू शोधल्यावर, खर्‍या ई-कॉमर्स कंपनीसह अनेक बनावट ई-कॉमर्स वेबसाइट्सची यादी आपल्यासमोर स्क्रीनवर उघडते, जी अत्यंत कमी दरात वस्तूंची किंमत दर्शवते. अशा बनावट वेबसाइट कंपनीचे नाव देखील कधी ऐकले नसते, 2500-3000 रुपयाची ब्रँडेड वस्तू  99 किंवा 159 सारख्या कमी किमतीत दाखवितात. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी एक बंद मोबाइल नंबर आणि बनावट ईमेल आयडी दर्शविली जाते, त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर नोंदणीकृत कंपनी किंवा कार्यालय देखील नसते. अशा फसवणुकीच्या वेबसाईट्सचे जाळे अंदाधुंदपणे जगभर पसरवून ग्राहकांची मोठी लूट केली जाते. सोशल मीडिया, नेटवर्किंग साइट्सवर अनेक वेळा अशा बनावट लिंक्स दाखवल्या जातात, आपण कोणत्याही मोहात न पड़ता नेहमी अस्सल ई-कॉमर्स कंपनीकडूनच खरेदी करावी. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लोभापोटी फेक ऑफरला बळी पडून लोकं आपली विवेकबुद्धी न वापरता खोट्या गोष्टींना सत्य मानून पैसे गमावतात आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांमध्ये सुध्दा त्या बनावट लिंक्स किंवा बनावट ऑफर शेअर करतात. आजकाल आपल्याला असे खोटे कॉल, मेसेज, ईमेल येत राहतात, कोणावरही लगेच विश्‍वास ठेवणे महागात पडू शकते. काळजी व सावधगिरी न घेतल्याचे नुकसान आपल्याला भोगावे लागते. आपण कोणतीही वस्तू विकत घेतांना, त्या वस्तूशी संबंधित संपूर्ण माहिती घ्यायला हवी, उदाहरणार्थ, त्या वस्तूची कमाल किंमत, त्याचे वजन, सामग्रीची गुणवत्ता आणि प्रमाण, पॅकिंगची तारीख, शेवटची तारीख, संपर्क तपशील, मान्यताप्राप्त संस्थेचे नाव आणि इतर माहिती देखील काळजीपूर्वक बघावी. वस्तूवर दर्शविलेल्या कमाल किमतीपेक्षा जास्त पैसे ग्राहकाकडून घेणे कायद्याने गुन्हा आहे. ग्राहकाने दुकानदाराला खरेदी केलेल्या वस्तूचे पक्के बिल विचारावे, पूर्ण समाधान झाल्यावरच वस्तू खरेदी करावी.
गेल्या तीन वर्षांत देशात 16 लाखांहून अधिक सायबर गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सायबर फसवणुकीच्या अहवालांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2022 च्या पहिल्या आणि दुसर्‍या तिमाहीत सायबर फसवणुकीच्या तक्रारींमध्ये 15.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे, नंतर ते 34 टक्क्यांंपर्यंत वाढले. आरबीआईच्या मते, सप्टेंबर 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात यूपीआई पेमेंटमध्ये 1200 टक्के वाढ झाली आहे. एक्सपेरियनच्या ग्लोबल आयडेंटिटी अँड फ्रॉड रिपोर्ट 2022 च्या सर्वेक्षणानुसार, जवळपास एक तृतीयांश भारतीय ग्राहक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडले आहेत. प्रामुख्याने सोशल मीडिया साइट्स (38%), पेमेंट सिस्टम प्रदाते (30%) आणि ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म (30%) वर फसवणूक अनुभवली. ओपसेक सिक्युरिटीच्या संशोधनानुसार, 2020 मध्ये 86% ग्राहक ओळख चोरी, क्रेडिट/डेबिट कार्ड फसवणूक किंवा डेटा उल्लंघनाचे बळी होते, 2019 च्या तुलनेत 80% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. फेडरल ट्रेड कमिशनने अहवाल दिला की यूएस ग्राहकांनी गेल्या वर्षी 2021 मध्ये फसवणुकीमुळे 5.8 अब्ज डॉलर गमावले, 2020 च्या तुलनेत 70% पेक्षा जास्त. मायक्रोसॉफ्ट 2021 ग्लोबल टेक सपोर्ट स्कॅम रिसर्च रिपोर्टनुसार, भारतातील ग्राहकांनी 2021 मध्ये 69% वर ऑनलाइन फसवणुकीचा उच्च दर अनुभवला. लोकल सर्कल्स या खाजगी कंपनीने सर्वेक्षणात उघड केले आहे की 42% भारतीयांनी गेल्या 3 वर्षात आर्थिक फसवणुकीचा अनुभव घेतला आणि त्यापैकी 74% पैसे परत मिळवण्यात अयशस्वी झाले. आरबीआई च्या म्हणण्यानुसार, बँकांच्या फसवणुकीमुळे गेल्या 7 वर्षांत भारताला दररोज किमान 100 कोटींचे नुकसान झाले आहे.
ग्राहकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी व योग्य न्याय मिळावा यासाठी त्यांना काही अधिकार देण्यात आले आहेत जसे की:- सुरक्षिततेचा अधिकार, माहिती मिळण्याचा अधिकार, निवडीचा अधिकार, ऐकण्याचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत, ग्राहकाला कुठूनही तक्रार नोंदवण्याचा अधिकार, उत्पादनाच्या दायित्वांतर्गत नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार आणि त्याची तक्रार का नाकारली गेली हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहक, उत्पादन उत्पादक, उत्पादन विक्रेता, उत्पादन सेवा प्रदाता, व्यापारी, जाहिरात संस्था, समर्थनकर्ता आणि ई-कॉमर्स विक्रेता यांना लागू होतो. ग्राहक संरक्षणासाठी अनेक कायदे केले गेले आहेत जसे:- ग्राहक संरक्षण कायदा 1986, भारतीय करार कायदा 1972, वस्तूंची विक्री कायदा 1930, अन्न भेसळ प्रतिबंध कायदा 1954, ट्रेड मार्क कायदा 1999 आणि इतर. तुम्ही ग्राहक तक्रार 1800-11-4000 किंवा 1915 (टोल फ्री) वर कॉल करू शकता किंवा तुमची तक्रार नोंदवण्यासाठी 8800001915 वर एसएमएस करू शकता, ऑनलाइन तक्रार सुद्धा नोंदवू शकता. केवळ सायबर आर्थिक फसवणुकीशी संबंधित तक्रारींसाठी 1930 डायल करावे. तुमची वैयक्तिक माहिती सर्वत्र शेअर करू नका, बँकिंग खात्याची माहिती देणे नेहमी टाळा, आरबीआई ने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, नेहमी सतर्क राहा, तुमचे अधिकार समजून घ्या आणि जागरूक ग्राहक बना.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

लाजिरवाणे

Next Post

अलिबागचा सचिन पाटील महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग संघाचा प्रशिक्षक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
अलिबागचा सचिन पाटील महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग संघाचा प्रशिक्षक

अलिबागचा सचिन पाटील महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग संघाचा प्रशिक्षक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?