मोबाईलवर संपर्क केल्यास मदत मिळणार; आपत्ती नियंत्रणासाठी पनवेल महापालिका सज्ज

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात आपत्ती काळात अत्यावश्यक वस्तू, व्यवस्थापन कक्षाचा आढावा आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्यालयात नुकताच घेण्यात आला. नागरिकांना आपत्कालीन वेळेत मदतीसाठी महापालिकेकडून मोबाईल क्रमांक जारी करण्यात आले आहेत. महापालिकेमार्फत कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी पावसाळ्यादरम्यान येणार्‍या आपत्ती नियंत्रणासाठी 24 तास सुरू असलेले नियंत्रण कक्ष सज्ज आहे. पालिका मुख्यालयातील अग्निशमन विभागाच्या तळमजल्यावर हे केंद्र उभारण्यात आले आहे.

1 जून ते 30 सप्टेंबर या काळात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले. आपत्ती काळात मुख्यालय आणि प्रभाग समितीच्या कर्मचार्‍यांनी एकमेकांमध्ये संवाद साधून काम करावे, अशा सूचना प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आल्या. या बैठकीला उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, सहायक आयुक्त डॉ. वैभव विधाते, प्रभाग अधिकारी, मुख्यालयातील अधिकारी आदी उपस्थित होते. मुख्यालयातील अग्निशमन विभाग संपर्क क्रमांक 022-27458040/41/42, दूरध्वनी 022-27469500, टोल फ्री 1800227701, व्हॉट्सप 9769012012

Exit mobile version