महामार्गावर कंटेनर पलटी

| रसायनी | वार्ताहर |

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वावंढळ येथे चालता कंटेनर पलटी झाला, त्याला सरळ उभा केल्यावर त्यातून गळती सुरू झाली आणि दुचाकीस्वार यांना अपघाताचे आमंत्रण मिळाले.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वावढळ येथील अपघाती पुलाच्या जवळ एम.एच.43 ध-9031 या क्रमांकाचा कंटेनर उलटून रस्त्याखाली पडला होता. काल दुपारी हायड्रा व जेसीबी च्या सहाय्याने त्याला वरकाढून ठेवण्यात आला होता. कंटेनर काढत असताना त्यात असलेले ऑईल चे बॅरल फुटले, त्यातून ऑईल गळती झाली होती. त्याच्याकडे गाडी मालक व इतरांनी दुर्लक्ष केले. शनिवारी सकाळी त्यातून ऑईल गळती मोठया प्रमाणात होऊन सुमारे पस्तीस ते चाळीस फूट रस्ता ऑईल ने व्यापला होता. सकाळी धुक्यात न दिसल्याने व हा रस्ता चढणीचा असल्याने ऑईल नजरेत येत नव्हते, त्यामुळे बाईकस्वार पडले. किरकोळ मार असल्याने ते गेले.

ही बाब तात्काळ आयआरबी व अपघातग्रस्त टीमच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी त्यावर माती टाकून रस्ता सुरळीत केला.

काही वेळ मार्ग बदलण्यात आला होता. हा प्रकार रविवारी घडला असता तर, दर रविवारी अनेक बाईक रायडर लोणावळा येथे सुसाट जात असतात. त्यांची गतीही मोठी असते, त्यामुळे ते पडले असते आणि मोठा अपघात होऊन जिवीतहानी झाली असती.

Exit mobile version