करळ उड्डाणपुलाखाली कंटेनरचे बसस्थान

। उरण । वार्ताहर ।

जे.एन.पी.टी. बंदराला जोडणार्‍या करळ येथील बहुमार्गी उड्डाणपूलाखाली जड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे उरणच्या करळ पुलाचे रूपांतर कंटेनर वाहनांच्या बस्थानात झालं आहे. अनेक मार्गांना जोडणार्‍या या उड्डाणपुलाखाली जिथे जागा मिळेल तिथे कंटेनर वाहने उभी करून पुलाखाली जागेचा बेकायदा वाहनतळ म्हणून वापर केला जात आहे. या बेकायदा वाहनतळाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच वाहतूक विभागाकडून ही दुर्लक्ष केले जात आहे.

मुंबई उच्च न्यायालल्याने शहरातील तसेच महामार्गावरील उड्डाणपुलाखाली अतिक्रमण करण्यास सक्त मनाई केली आहे. तरी देखील बहुतांशी उड्डाणपुलाखाली वाहने उभी केली जात आहेत. दुसरीकडे उड्डाणपूलांखाली वाहने उभी करू नये, यासाठी तयार करण्यात आलेले कठडे तोडून वाहनांचे अतिक्रमण झालेले निदर्शनास येत आहे. यामध्ये करळमधील उरण-पनवेल मार्ग, जे.एन.पी.टी.- धुतुम मार्ग या पुलाखाली वाहने उभी केली जात आहेत.

Exit mobile version