कंटेनरची अज्ञात वाहनाला धडक; चालक गंभीर जखमी 

| खोपोली | प्रतिनिधी |

मुबंई-पुणे एक्सप्रेसवेवर आज रात्री एका कंटेनरने समोरील अद्यात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात केबिनमध्ये चालक अडकून गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली आहे. 

मुबंई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात आज रात्री तीन वाजता एका मुबंई-पुणे एक्सप्रेसवेवरून कंटेनर मुबंईहुन माल घेऊन पुण्याकडे जात असताना तो सावरोली गावाजवळ आला असताचा चालकाचे  वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील चालणाऱ्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली, यात कंटेनरच्या केबिनमध्ये चालक अडकून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर कंटेनरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे अपघात ग्रस्त वाहन आयआरबीच्या क्रेनने बाजूला घेऊन एक्सप्रेसवेवर वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे.

Exit mobile version