| पोलादपूर | वार्ताहर |
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर शहराच्या लगत असलेल्या चोळाई गावाजवळ आज दुपारच्या सुमारास चिपळूण बाजूकडून मुंबई दिशेने जाणारा कंटेनर ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ट्रक सह साहित्य चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर या कॉर्नर वर अति वेगाने उतरत असताना चालक सद्दाम महंमद माकोडा रा. गुजरात याचा ट्रक वरील ताबा सुटल्याने महामार्गावरील लोखंडी बॅरिकेट्स तोडून पलटी झाला आहे. या अपघातात सुदैवाने चालक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर रस्त्यावरच उलटल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून, महाकाय ट्रक महामार्गावर बॅरिकेट्सवर आडवा झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. या घटनेची माहिती समजतात सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवलदार रुपेश पवार, व कोंढाळकर, सतीश कदम, यांच्यासह कशेडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक काही काळानंतर सुरळीत सुरू केली आहे.







