नावाडा फाट्यावर कंटेनर पलटी

| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |

मुंब्रा-पनवेल मार्गांवरून तळोजा औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी नावडे फाटा येथीलल रेल्वे फटकावर बांधन्यात आलेल्या उड्डाण पुलाचा वापर करण्यात येतो. याच मार्गांवरून कल्याण-डोंबिवलीच्या दिशेला जाता येत असल्याने या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी असते. अशातच या पुलाखाली कंटेनर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना गुरूवारी (दि.12) पहाटे सहा वाजताच्या सुमारास घडली होती. या अपघातामुळे मार्गावर दोन ते तीन किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हा कोसळलेला कंटेनर बाजूला करून मार्गावरील वाहतूक नियमित करण्यासाठी वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.

Exit mobile version