। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्य येथे रविवारी (दि.13) सकाळच्या सुमारास एक कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली. यावेळी काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.
पेणकडून पनवेलकडे जाणार्या (आरजे-09-जीई-5577) कंटेनरमध्ये केमिकल पावडरची वाहतूक होत होती. या कंटेनरवरील चालकाचे कर्नाळा अभयारण्याजवळील एका वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहचून वाहतूक कोंडी दूर केली.