नवे संकट! मॉर्डना लसीत आढळला दूषित पदार्थ

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जपानमधील कोरोना लसीकरण मोहिमे दरम्यान एक मोठे संकट निर्माण झाले असून मॉडर्ना कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीत एक दूषित पदार्थ आढळून आल्याच्या तक्रारी समोर आल्यामुळे जपानमधील लसीकरण मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.

मॉडर्ना लसीत जवळपास 15 दिवसांपूर्वी दूषित पदार्थ आढळल्याची पहिली घटना समोर आली होती. त्यानंतर मॉर्डन लसीचा स्टॉक न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार मॉडर्ना लसीमध्ये रविवारी देखील दूषित पदार्थ आढळून आल्याची तक्रार समोर आली आहे. या वृत्तानंतर जपानमध्ये आतापर्यंत जवळपास 10 लाख अतिरिक्त लसींचा वापर करणे बंद करण्यात आले आहे.

अद्याप लसीच्या कुपीत आढळून येणारा दूषित पदार्थ नेमका काय आहे याबाबतची माहिती समोर आलेली नाही. जपानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लसीत आढळलेला दूषित पदार्थ एक धातूचा कण असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या दूषित पदार्थाचे परिक्षण केले जात असून लवकरच याबाबतची अधिकृत माहिती समोर येईल असेही सांगण्यात येत आहे.

Exit mobile version