उरणमध्ये क्रिकेट सुरु ठेवा; क्रिकेट रसिकांची मागणी

। उरण । वार्ताहर ।
उरणमध्ये सध्या क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु वाढत्या कोव्हिड रूग्णांच्या संख्येमुळे खेळाच्या स्पर्धा भरविण्यावर निर्बंध ठेवण्यात आले आहेत. त्यासंदर्भा महागणपती टीम चिरनेरतर्फे काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांना निवेदन देत क्रिकेट स्पर्धा सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.


सध्या कोव्हिड 19 च्या अनुषंगाने ओमिक्रॉन या जीवघेणा विषाणू वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन यांनी विविध प्रकारचे निर्बंध लावले आहेत. सध्या क्रिकेटचा सिजन चालु आहे. तरुणांमध्ये क्रिकेट या खेळाची क्रेज मोठ्या प्रमाणात आहे. अनेक गावात, विभागात क्रिकेटच्या मानाच्या स्पर्धा भरविण्यात येत असतात. परंतु, सध्या वेगाने ओमिक्रॉन विषाणूचा प्रभाव वाढत असल्याने प्रशासनाने अनेक जाचक अटी व निर्बंध लावले आहेत. परंतु हे फक्त उरण तालुक्यासाठीच का? या संदर्भात रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनचे सदस्य तसेच उत्कृष्ट निवेदक राजेंद्र भगत यांनी या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्याकडे आपल्या उरण तालुक्यातील युवकांची व्यथा मांडली. महागणपती टीम चिरनेर तर्फे त्यांना निवेदनही देण्यात आले. त्यावर महेंद्र घरत यांनी सांगितले की, लवकरच येत्या एक ते दोन दिवसात डीसीपी साहेबांसोबत मिटिंग घेऊ. आणि त्यावर योग्य तो लवकरच तोडगा काढू असे आश्‍वासित केले.

Exit mobile version