| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या संकल्पनेतून आजचा हा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला आहे. त्यांच्या आग्रहाखातर सोहळा आयोजित केला आहे. पाटील कुटुंबियांवर व पक्षावर असलेल्या प्रेमाखातर आज कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. पक्षावर असेच प्रेम, निष्ठा ठेवा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांनी केले. दरम्यान, शेकापचे नेते स्व. प्रभाकर पाटील यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना सुप्रिया पाटील यांनी उजाळा दिला. एक लाडकी सून म्हणून ते मला बोलत असत, असे त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांच्याबरोबर राजकारणात झोकून देऊन काम करत आहे. स्व. प्रभाकर पाटील यांच्यामुळे ते शक्य झाले. पक्षामुळे आज मला अनेक पदे मिळाली आहेत. पक्षासाठी काम करत राहणे, हे माझे कर्तव्य आहे, अशी ग्वाही यावेळी सुप्रिया पाटील यांनी दिली.







