बँकांमध्येही आता कंत्राटी भरती

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आता बँकांमध्येही कर्मचार्‍यांना सामावून घेतले जाणार आहे. या कर्मचार्‍यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपला खर्च कमी करण्यासाठी मानव संसाधनाशी संबंधित समस्यांसाठी स्वतंत्र कंपनी सुरू करणार आहे. स्टेट बँकेच्या ऑपरेशन आणि सपोर्ट उपकंपनीला अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे. सुरुवातीला, कंपनी ग्रामीण आणि निमशहरी भागातील बँक शाखांमधील कर्मचार्‍यांचे व्यवस्थापन करणार आहे.

Exit mobile version