। रायगड । सुयोग आंग्रे ।
रायगड जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्या शाळांवर आता प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे साडेपाचशे शाळांचा पट दहापेक्षा कमी आहेत. यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाची जबाबदारी कंत्राटी शिक्षकांवर देण्यात येणार आहे. पण, विधानसभा निवडणुकीनंतर त्याची कार्यवाही होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक भरतीनंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांना अजूनहीशिक्षक (मराठी, उर्दु, कन्नड माध्यम) कमी आहेत. शाळांना पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक नसल्याने जिल्ह्यातील जवळपास साडेपाचशे शाळांमधील पदे समानीकरणात अडकली आहेत. ङ्गआरटीईफनुसार 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा, असा नियम आहे. पण, त्यानुसार सर्वच शाळांमध्ये कार्यवाही झालेली नाही.या पार्श्वभूमीवर पूर्वी 20 पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय झाला. या निर्णयात पुन्हा बदल करण्यात आला आणि आता नवीन निर्णयानुसार 10 पेक्षा कमी पटाच्या शाळांवर डीएड- बीएडधारक सुशिक्षित बेरोजगार तरूणांना कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार आहे. त्यांची नियुक्ती पहिल्यांदा एकाच वर्षासाठी असणार असून त्यानंतर त्यांना पुढे संधी द्यायची की नाही याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी घेणार आहेत.
24 या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता करताना आधार व्हॅलिड पटसंख्याच ग्राह्य धरावी, असे शालेय शिक्षण विभागाचे आदेश होते. पण, शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर या निर्णयातून सवलत देत आधारव्हॅलिड पटावरील 10 टक्के विद्यार्थी शाळेत आहेत. पण त्यांचे आधारकार्ड नाही. त्यांचाही विचार केला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पटसंख्येअभावी अतिरिक्त होणार्या शिक्षकांचे प्रमाण कमी होणार आहे. पण, हा निर्णय कायमचा नसून यापुढे आधारव्हॅलिड पटसंख्याच ग्राह्य धरली जाईल, असेही वरिष्ठ अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.