। रसायनी । प्रतिनिधी ।
चौक भिलवले गावच्या हद्दीत बांधकामाच्या ठेकेदारीवरून ठेकेदाराला मारहाण केल्याने तिघांवर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन तानाजी ठोंबरे (वय 50, धंदा ठेकेदारी, रा. भिलवले पोस्ट वावंढळ, ता. खालापुर) यांची भिलवले येथे स.न. 30/2 ही जमीन होती. पूर्वीच त्यांनी ती जमीन विकली होती, मात्र घेणारे यांनी ती जमीन त्यांनाच सांभाळण्यासाठी देऊन त्यांच्याच ताब्यात दिली होती, त्या जमिनीत भविष्यात काही विकास कामे करायची झाल्यास ती तुम्हीच करा, असे तोंडी बोलणे झाल्याप्रमाणे जमीन मालकांनी ते काम सचिन ठोंबरे यांना करण्यास सांगितले. त्या प्रमाणे 20 मे २०26 पासून जमिनीला आरसीसी संरक्षण भिंतीचे काम सुरू करताना सोबत भाऊ आणि मित्राला घेऊन तिघे मिळून काम करू लागले. त्याच भिलवले गावातील ओळखीचे रमेष दत्तात्रेय पवार, गिरीश अनंता दाभणे व नितेष विटकर हे साईटवर येऊन काम बंद करण्यास सांगितले. या पुढे काम करायचे नाही, आम्हीच काम करणार, असे दमदाटी करून विट-दगडीने सचिन ठोंबरे याला मारहाण केली. काम बंद न केल्यास व आम्हाला न दिल्यास ठार मारू, अशी धमकी देऊन निघून गेले. यात सचिन ठोंबरे जखमी झाला सून त्याला चौक येथील रुग्णालयात उपचार घेण्यात आले. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विशाल पवार हे करीत आहेत.
भिलवले येथे ठेकेदाराला मारहाण
