शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्या; शेकाप नेते पंडित पाटील यांचे आवाहन

| रोहा | प्रतिनिधी |
मेढा हायस्कूल येथे स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या चेअरमनपदावर लक्ष्मण महाले यांची नेमणूक संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी नुकतीच केली होती. हा पदग्रहण सोहळा शेकाप नेते तथा संस्थेचे संचालक पंडित पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी तसेच शिक्षक, सेवकवृंद आणि स्थानिक कार्यकर्त्यांनीदेखील योगदान द्यावे, असे आवाहन पंडित पाटील यांनी केले.
बहुजन समाजातील मुले शिकली पाहिजेत, या विचाराने लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील यांनी कोएसोच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या. त्याचे फायदे आज दिसून येत आहेत. या शाळांच्या माध्यमातून शिक्षण घेतलेली पिढी आज अनेक ठिकाणी उच्च पदांवर कार्यरत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे, असेदेखील पंडित पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमास शंकरराव म्हसकर, गणेश मढवी, नंदकुमार म्हात्रे, हेमंत ठाकूर, शिवराम महाबळे, रुपाली मढवी, दीपक दाईटकर, हरिश्‍चंद्र खांडेकर, शशिकांत कडू, जीवन देशमुख, गणेश खरीवले, हरेश म्हात्रे, लियाकत खोत यांच्यासह स्थानिक पालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version