वृक्ष लागवडीत विद्यार्थी पालकांचा योगदान महत्वाचे !

बीडीओ प्रभेंचे प्रतिपादन
। माणगाव । प्रतिनिधी ।

वृक्ष लागवडीत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांचे योगदान महत्वाचे आहे असे प्रतिपादन माणगाव बीडीओ एन. प्रभे यांनी केले. तळेगाव तर्फे गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणार्‍या रेपोली गावातील रा.जि.प. शाळेत आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर कृषी अधिकारी बाळकृष्ण काप, कटरे, लवटे, अशोक माडकर, विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड, विनोद मिंडे, तळेगाव तर्फे गोरेगाव ग्रामपंचायत सरपंच निलेश म्हात्रे, उपसरपंच गोपाल नाडकर, ग्रामसेवक नरेंद्र घाडगे, सदस्य कीर्ती कडू, संगीता अवाद, पोलीस पाटील श्री मोरे, शाळेचे मुख्याध्यापक महाले, ग्रामस्थ श्री. जांभरे, शिक्षक व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अधिकारी, ग्रामस्थ यांनी रेपोली संभाव्य दरडग्रस्त गावाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीला शासनाकडून 800 बाबूंची रोपे दिली असल्याचे प्रभे यांनी सांगितले. या रोपांची लागवड दरडग्रस्त भागात लावून जमिनीची होणारी धूप थांबवता येईल ,असे ते म्हणाले. शाळा, रेपोली तलाव, अमृत सरोवर अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी बदाम, अशोक, निव, पेरू, चिकू या सारख्या वृक्षांची लागवडही करण्यात आली. या वृक्ष लागवडीत विद्यार्था बरोबर ग्रामस्थांचा हि सहभाग महत्वाचा असून वृक्षांचे संगोपन करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. देशाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने 15 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा झेंडा उभारून अमृत महोत्सव साजरा करावा असे आवाहनही केले. यावेळी कृषी अधिकारी बाळकृष्ण काप यांनी वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले.

Exit mobile version