पाकिस्तान संघाच्या खाजगी डिनर पार्टीचा वाद

| अमेरिका | वृत्तसंस्था |

पाकिस्तानी संघ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडतो. सध्या पाकिस्तानी संघ टी-20 विश्‍वचषक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेला आहे. पाकिस्तानी संघ 6 जून रोजी टी-20 विश्‍वचषकात पहिला सामना खेळणार आहे. मात्र, या सामन्याआधीच पाकिस्तानी संघाने एका खासगी डिनरचे आयोजन केले होते. तेथे चाहत्यांना भेटायला बोलावले होते. पण चाहत्यांना प्रवेश विनामूल्य नव्हता. पाकिस्तानी खेळाडूंना भेटण्यासाठी चाहत्यांकडून 25 डॉलर्स उकळण्यात आले. पाकिस्तानचा माजी खेळाडू रशीद लतीफच्या एका व्हिडीओवरून हा खुलासा झाला आहे.


पाकिस्तानचा माजी खेळाडू रशीद लतीफने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रशीद लतीफ म्हणतो की, त्याने अधिकृत डिनरबद्दल ऐकले आहे, परंतु ते एक खाजगी डिनर होते. हे कोणी केले. हे कोण करू शकेल? हा मूर्खपणा आहे. याचा अर्थ तुम्ही आमच्या खेळाडूंना 25 डॉलर्समध्ये भेटू शकता. अल्लाह तुम्हाला आशीर्वाद देईल. काही गडबड झाली असती, तर लोक म्हणाले असते की खेळाडू अशा प्रकारे पैसे कमवतात. रशीद लतीफ म्हणाले की चॅरिटी डिनर आयोजित करण्याची कल्पना समजू शकतो. पण पैसे घेऊन खाजगी डिनर आयोजित करणे समजण्यापलीकडचे होते. लोक मला सांगतात की जो कोणी पाकिस्तानी खेळाडूंना फोन करतो. ते विचारतात किती पैसे देणार? आता ही प्रथा रूढ झाली आहे. जुना काळ वेगळा होता. पहिले 2-3 डिनर आयोजित केले जायचे, ते पण अधिकृत असायचे. मात्र आता ही गोष्ट खूप हायलाइट झाली आहे. कारण हा अमेरिकेचा दौरा आहे. त्यामुळे हे करताना पहिल्यांदा विचार करुन करायला हवे होते. हे चॅरिटी डिनर नव्हते. त्यात पाकिस्तानचे नाव, पाकिस्तान क्रिकेटचे नाव आहे. त्यामुळे अशा चूका करू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version