मेडिकल टेक्नॉलॉजीस्टचे गोव्यात अधिवेशन

| म्हसळा | वार्ताहर |

मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ रायगडचे 26 वे अधिवेशन म्हसळा येथील प्रेरणा क्लिनिकल लॅबचे संचालक सुशील यादव यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव शनिवार (दि.3) आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनात तब्बल 100 प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यादव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. या शिबिरात रायगड जिल्ह्यातील उपस्थित लॅबधारकांना मार्गदर्शन देण्यासाठी गोवा येथील प्रसिध्द डॉ. गौरव खरे, तसेच महाराष्ट्र पॅरा वैद्याकिय परिषदेचे माजी सदस्य कुमार पाटील हे उपस्थित रहाणार आहेत. अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष पंकज दुर्गे, सचिव कमलेश चौधरी, आबिद खान, मयुर ओक, सुनील पटेल, दिपा चव्हाण, वीणा नेमाडे, वैशाली जाधव, पुरब मेहता, मित्रा पाटील, महेंद्र पिंगळे यांच्या समवेत अनेक ज्येष्ठ -कनिष्ठ सदस्य मेहनत घेत आहेत.

Exit mobile version