साकवाच्या कामासाठी सहकार्य करावे

| उरण | वार्ताहर |

उरण शहराला जोडणाऱ्या उरण-पनवेल रस्त्यावरील जीर्ण झालेल्या साकवांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागानी शुक्रवार (दि.12) पासून हाती घेतले आहे. तरी प्रवाशी नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन साकवाच काम उत्तम दर्जाचे होण्यासाठी प्रवाशी नागरीकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करून सुरु असलेल्या साकवाच्या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार यांनी केले आहे.

शहराला जोडणाऱ्या उरण-बोकडविरा फाटा या रस्त्यावरील दोन साकव हे जीर्ण झाले असल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. त्यामुळे दोन्ही साकवांचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरण कार्यालयाकडून हाती घेण्यात आले आहे. सदर साकवाच्या कामा ठिकाणी पर्यायी जागा किंवा रस्ता नसल्याने प्रवाशी नागरीकांना पर्याय म्हणून नवीन शेवा ग्रामपंचायत जवळील बोकडविरा रेल्वे उड्डाणपूल ते उरण चारफाटा हा रहदारीसाठी योग्य आहे. तरी प्रवाशी नागरीकांनी साकवाचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी म्हणून पर्यायी रस्त्याचा वापर करून सार्वजनिक बांधकाम विभागाला सहकार्य करावे असे पवार यांनी नमूद केले आहे.

Exit mobile version