पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जे.एम.म्हात्रे ट्रस्टचे सहकार्य

पनवेल | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे सामाजिक बांधिलकीतून विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने प्रशासनाला आवश्यक त्या ठिकाणी जे.सी.बी.,डंपर,पिण्याच्या पाण्याचे टँकर, ग्रेडर इत्यादी मशिनरी स्वच्छतेचे प्राधान्य देऊन पाठविण्यात आली. पुढील दोन दिवस आता आवश्यक त्या इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत तेथे वस्तू पोहोच करण्यात येतील.
दुर्घटनाग्रस्त लोकांना एकच विनंती आहे धीर सोडू नका, आमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आपल्या पाठीशी कुटुंबाप्रमाणे आहे अशी भावना विरोधी पक्षनेते .प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी व्यक्त केली.

Exit mobile version