कोपा फुटबॉल स्पर्धा अमेरिकेत

16 देशांमध्ये चुरस; 14 स्टेडियममध्ये लढती


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

कोपा ही जागतिक स्तरावरील मानाची फुटबॉल स्पर्धा पुढल्या वर्षी (2024) अमेरिकेत रंगणार आहे. दक्षिण अमेरिका, मध्य व उत्तर अमेरिका आणि कॅरेबियन संघटनांकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. 2016 नंतर तब्बल आठ वर्षांनंतर अमेरिकेमध्ये कोपा स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत 16 देशांमध्ये जेतेपदाची झुंज रंगणार आहे. ही स्पर्धा 20 जून ते 14 जुलैदरम्यान पार पडेल. दक्षिण अमेरिकन उपखंडातील दहा देशांचा या स्पर्धेमध्ये सहभाग असणार आहे. तसेच उत्तर, मध्य अमेरिका व कॅरेबियन बेटांवरील सहा देशही यामध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढती चार्लोट व ईस्ट रुदरफोर्ड येथे होणार असून, मियामी गार्डन्स येथे अजिंक्यपदाचा फैसला होणार आहे.

या मैदानांवर होणार लढती
एटी अँड टी स्टेडियम (अर्लिंग्टन), मर्सिडीज बेन्ज स्टेडियम (अटलांटा), क्यू 2 स्टेडियम (ऑस्टीन), बँक ऑफ अमेरिका स्टेडियम (चार्लोट), मेटलाईफ स्टेडियम (ईस्ट रुदरफोर्ड), स्टेट फार्म स्टेडियम (ग्लेनडेल), एनआरजी स्टेडियम (हॉस्टन), सोफी स्टेडियम (इंगलवूड), चिल्ड्रेन्स मर्सी पार्क (कॅनसास सिटी), रोहेड स्टेडियम (मिसॉरी), लेजायंट स्टेडियम (पॅराडाईज), हार्ड रॉक स्टेडियम (मियामी गार्डन्स), एक्सप्लोरिया स्टेडियम (ओरलँडो), लेवी स्टेडियम (सँटा क्लॅरा).

स्पर्धेतील सहभागी संघ
दक्षिण अमेरिकन उपखंडातील देश- अर्जेंटिना, बोलिविया, ब्राझील, चिली, कोलंबिया, इक्वेडोर, पॅराग्वे, पेरू, उरुग्वे, वेनेझुएला. उत्तर, मध्य अमेरिका आणि कॅरेबियन बेटावरील देश- जमैका, मेक्सिको, पनामा, अमेरिका.

Exit mobile version