कॉर्बेव्हॅक्सला मंजुरी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
मुलांच्या लसीकरण मोहिमेला आणखी बळ मिळाले आह़े बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या कॉर्बेव्हॅक्स या 12 ते 18 वयोगटासाठीच्या लशीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आह़े 12 ते 18 वयोगटासाठी कॉर्बेव्हॅक्स लशीच्या आपत्कालीन वापराची शिफारस तज्ज्ञ समितीने 14 फेब्रुवारीला केली होती़ त्यानुसार काही अटींच्या अधीन राहून कॉर्बेव्हॅक्सला परवानगी देण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सोमवारी सांगितल़े बायोलॉजिकल ई लिमिटेडचे गुणवत्ता व नियमन विभागाचे प्रमुख श्रीनिवास कोसाराजू यांनी 9 फेब्रुवारीला केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे कॉर्बेव्हॅक्ससाठी अर्ज केला होता़ या अर्जानुसार 5 ते 18 वयोगटातील मुलांवर कॉर्बेव्हॅक्स लशीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या करण्यासाठी कंपनीला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये परवानगी मिळाली होती़ त्यानंतर ऑक्टोबरपासून घेतलेल्या चाचण्यांमधून लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यात आल़े

Exit mobile version