कोरोना लागली उतरती कळा


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, करोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणार्‍या करोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणार्‍याची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे.

देशातील रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ सुरू आहे. मात्र असे जरी असले तरी अद्यापही करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच असल्याने काहीशी चिंता कायम आहे. मागील 24 तासात देशभरात 1 लाख 32 हजार 062 रूग्ण करोनातून बरे झाले असून, 80 हजार 834 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 3 हजार 303 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,94,39,989 झाली असून, आजपर्यंत 2,80,43,446 रूग्ण करोनातून बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. तर, देशभरात आजपर्यंत 3,70,384 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या 10,26,159 आहे.

देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आजपर्यंत 25,31,95,048 लोकांचे लसीकरण झालेले आहे. तर, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात 12 जून पर्यंत 37,81,32,474 नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी 19,00,312 नमुन्यांची काल तपासणी झालेली आहे. आयसीएमआरच्य हवाल्याने हे वृत्त देण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रालाही दिलासा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून 11 हजारांच्या आसपास असणारा कोरोना बाधितांचा आकडा आज काहीसा कमी झाला आहे. गेल्या चोवीस तासात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या जास्त आहे. राज्यात 14 हजार 910 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 10 हजार 697 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासात 360 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात सध्या 1,55,474 सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 56,31,767 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.48% टक्के इतकं झालं आहे. सध्या राज्यात 9,63,227 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,807 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Exit mobile version