रायगड जिल्ह्यात कोरोना वाढतोय; सक्रीय रूग्ण 128 वर

नवीन 12 कोरोना रूग्ण,चार कोरोना मुक्त

जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात पनवेल मनपा सह, माणगाव तालुक्यामध्ये एकूण 12 रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 128 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा जनतेने सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे गरज निर्माण झाली आहे. सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला असून तर दिवसभरात चार रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
रविवारीवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 12 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील आणि माणगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन अशा चार रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 535 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 709 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर गेला आहे. सद्यस्थितीत 128
सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत

Exit mobile version