टीम इंडियात पुन्हा कोरोनाचा शिरकाव!

विंडीजविरुद्धची मालिका अडचणीत
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांपूर्वी भारतीय क्रिकेट संघात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून अनुभवी सलामीवीर शिखर धवन, नवोदित ऋतुराज गायकवाड आणि मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच प्रशासकीय साहाय्यकांनाही बाधा झाली आहे.
भारत आणि विंडीज या संघांमध्ये प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकांच्या तयारीसाठी भारतीय संघ 31 जानेवारीला अहमदाबाद येथे दाखल झाला. त्यानंतर खेळाडू तीन दिवस विलगीकरणात होते. ङ्गङ्घधवन, गायकवाड आणि श्रेयस यांचा करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. तसेच दोन ते चार प्रशासकीय साहाय्यकांनाही कोरोनाची बाधा झाली आहे,फफ असे ङ्गबीसीसीआयफच्या सूत्रांनी सांगितले.
उभय संघांतील एकदिवसीय मालिकेचे सामने अहमदाबाद येथे खेळवले जाणार आहेत. 6 फेब्रुवारीला होणारा मालिकेतील पहिला सामना हा भारताचा 1000वा एकदिवसीय सामना असेल. मात्र, करोनाबाधित असल्याने धवन, गायकवाड आणि श्रेयस हे पहिल्या सामन्याला मुकणार हे जवळपास निश्‍चित आहे. त्यांना आठवडाभर विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतर दोन वेळा करोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यावर त्यांना पुन्हा संघात दाखल होता येईल.
या तिघांच्या अनुपस्थितीत शाहरूख खान, आर. साई किशोर व रिशी धवन या खेळाडूंना संधी मिळू शकेल. तसेच केएल राहुलही पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नसल्याने कर्णधार रोहित शर्मासोबत डावखुरा वेंकटेश अय्यर भारताच्या डावाची सुरुवात करू शकेल.

मी अष्टपैलू खेळाडू -शार्दुल
मी स्वत:ला एक चांगला अष्टपैलू खेळाडू मानतो. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी स्वत:ला सिद्ध करू इच्छितो. माझी हार्दिकसोबत कोणतीच स्पर्धा नाही. हार्दिक तंदुरूस्त होऊन संघात लवकरच परतेल. आमच्या दोघांची फलंदाजी करण्याची शैली वेगळी आहे. हार्दिक पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. मी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर येतो. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कोणतीच स्पर्धा नाही. मी त्याची जागा घेण्याचा विचार करत नाही. मी जिथपर्यंत हार्दिकला ओळखतो त्याने मला पाठिंबाच दिला आहे. तो त्याचे अनुभव माझ्यासोबत शेअर करतो. मी पण तसंच करतो. मर्यादित षटकांच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू असणं संघासाठी चांगलं असतं.

Exit mobile version