आरोग्य तज्ज्ञांचा दावा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात करोनाच्या तिसर्या लाटेत प्रथमच नवीन रुग्णांची संख्या ही 1.6 लाखांच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 लाख 84 हजारांवर गेली आहे. दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या लवकरच शिगेला पोहोचू शकते. तसंच सध्याची लाट ज्या वेगाने येतेय, तितक्याच वेगाने ती ओसरण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अलीकडे ज्या भागात करोनाची रुग्णांची संख्या वाढली आहे, तिथे 3 महिन्यांत रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल. देशात 50 टक्क्यांपेक्षा जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण हे फक्त मोठ्या शहरांमध्ये आढळत आहेत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) अतिरिक्त संचालक डॉ. समीरन पांडा यांनी शनिवारी सांगितले.
कोरोनाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. अरोरा यांनीही कोरोनाची तिसरी लाट शिगेला कधी पोहोचेल? याची माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा जागतिक डेटा आणि गेल्या 5 आठवड्यांतील आपला अनुभव पाहता बहुतेक ओमिक्रॉनचा संसर्ग हा सौम्य आणि लक्षणे नसलेले असतात, असे डॉ. अरोरा म्हणाले.