जिल्ह्यात 2 हजार 163 रुग्णांची नोंद; 13 हजार 796 सक्रीय रुग्ण
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरूवार दि. 13 जानेवारी रोजी कोरोनाच्या 2 हजार 163 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात 468 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 13 हजार 796 सक्रीय रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
गुरूवारी पनवेल महापालिका हद्दीत 1 हजार 187, पनवेल ग्रामीण 214, उरण 97, खालापूर 90, कर्जत 44, पेण 173, अलिबाग 107, मुरुड 5, माणगाव 83, रोहा 43, तळा 5, सुधागड 2, श्रीवर्धन 18, म्हसळा 3, पोलादपूर 8 तर महाड 84 असे 2 हजार 163 रुग्ण आढळले.
आता पर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 89 हजार 725 झाली आहे. यापैकी 1 लाख 71 हजार 331 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 598 वर गेला आहे. सद्यस्थितीत 13 हजार 796 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.