कोरोना बहुरुपी विषाणू, सतर्क राहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोना हा बहुरुपी विषाणू असून, वारंवार रुप बदलत आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केली. तिसरी लाट रोखण्यासाठी चाचण्या आणि उपचार यावर अधिक जोर देण्याची गरज असून, लसीकरणावर जोर द्या, मास्कचा वापर करा आणि गर्दी टाळा असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत हिल स्टेशनवर होणार्‍या पर्यटकांच्या गर्दीवरही मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने 23 हजार कोटींचा नवं पॅकेज दिल्याची माहितीही मोदींनी दिली. लसीकरणावर जोर द्या, मास्कचा वापर करा आणि गर्दी टाळा, असं आवाहनही मोदींनी केले आहे.

Exit mobile version