प्रितम म्हात्रे यांना कोरोना वॉरियर पुरस्कार

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल मधील सुप्रसिद्ध पू. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या वतीने जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून कोव्हिड काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे सर्वेसर्वा सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते कोरोना वॉरियर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून कोव्हिड काळात प्रितम म्हात्रे यांनी समाजभिमुख काम केले आहे. अनेक गरजूंना मदतीचा हात दिलेला आहे. हजारो गरीबांना जेवण, अन्नधान्य, आर्थिक मदत करून पुण्याचे काम केलेले आहे. याच भावनेतून विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना सोनाली कुलकर्णी व सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते कोरोना वॉरियर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Exit mobile version