| अलिबाग | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज चौक उत्सव समिती अलिबागच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा सोहळा गुरुवारी (दि.06) सकाळपासून सुुरु होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ध्वजपूजन केले जाणार आहे. त्यानंतर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवराज्याभिषेक सोहळा सुरु होणार आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये कुलाबा ढोलताशा ध्वजपथक वादन व मानवंदना, जय हनुमान लाठीकाठी आखाडा भोनंग व अलिबाग मार्शल आर्ट्स अकादमी लाठीकाठी व मर्दानी खेळ, मंगलमूर्ती वाद्य पथक वादन व मानवंदना, स्ट्रींग फॅमिली प्रस्तुत ‘सूर मराठी माताची उत्सव शिवस्वराज्याचा’ असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. फटाक्यांची आतषबाजी करीत या कार्यक्रमांचा समारोप होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.