नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलीस कोठडी

| कल्याण | प्रतिनिधी |

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवार, 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील त्यांचे तीन सहआरोपी रमेश पवार, प्रमोद (प्रकाश) निकम आणि अक्षय कारंडे यांनाही पोलीस कोठडी देण्यात आली. सुनावणीदरम्यान म्हात्रे यांना एकच मूत्रपिंड असून आरोग्याच्या तक्रारी लक्षात घेऊन, कोठडीत आवश्यकतेनुसार तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले. तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने हा आदेश दिला.

Exit mobile version