| मुंबई | प्रतिनिधी |
नाशिकमध्ये होणाऱ्या कंभुमेळ्यानिमित्त महापालिकेने साधूग्राम साकारण्यासाठी तपोवनातील सतराशेहून अधिक वृक्षांवर हातोडा घालण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. त्यावर, भ्रष्टाचार हीच भक्ती आणि सत्ता हीच श्रद्धा असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तपोवनाचे महत्व काय कळणार? अशा शब्दांत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधऱ्यांवर घणघात केला आहे.
नाशिकमध्ये होणाऱ्या कंभुमेळ्यानिमित्त महापालिकेने साधूग्राम साकारण्यासाठी तपोवनातील सतराशेहून अधिक वृक्षांवर हातोडा फिरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नाशिककर आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. यादरम्यान, रोहित पवारांनी या प्रकरणावरून टीका केली आहे. तसेच, श्रद्धेचा बाजार मांडून विकासाच्या नावाखाली शहर भकास करू पाहणाऱ्यांचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार म्हणाले की, भ्रष्टाचार हीच भक्ती आणि सत्ता हीच श्रद्धा असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तपोवनाचे महत्व काय कळणार? सत्ताधाऱ्यांना विशेषतः नाशिकच्या कारभाऱ्यांना केवळ आणि केवळ प्रॉफिटची भाषा कळते. कुंभमेळ्याच्या नावाखाली जमीन मोकळी करायची आणि कुंभमेळा संपताच एखाद्या संस्थेच्या नावाने जमीन लीजवर घेऊन लाटायची हाच सत्ताधाऱ्यांचा खरा डाव असून तपोवनाची जमीन लाटण्यासाठीच एवढा अट्टहास सुरू आहेत. ते पुढे म्हणाले की, गुंडाचा वापर करून एखादं दुसरी नगरपालिका बिनविरोध केली म्हणजे प्रॉफिट कमवण्यासाठी त्याच पद्धतीने तपोवन खाली करता येईल, हा कोणाचा समज असेल तर हा तथाकथित संकटमोचकांचा गोड गैरसमज आहे, असे रोहित पवार म्हणाले.







