सध्या जिल्ह्यात लसीकरणाची पुरवठा नसल्याने सर्वसामान्य जनतेला लसीकरणापासून वंचित रहावे लागत आहे. रायगड जिल्ह्यात येणार्या अपुर्या लसींच्या साठ्यामुळे गतिमान लसीकरणाला ब्रेक लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण सामान्यांना उपलब्ध नसणारी लस भांडवलदारांसाठी मात्र सहज उपलब्ध करून दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सर्वसामान्य जनतेच्या जीवाची पर्वा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची सखोल आणि पुराव्यासकट बातमी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ‘कृषीवल’ करणार आहे. त्या वृत्तामध्ये या प्रकारात भांडवलदारांसोबत आर्थिक हितसंबंध जोपासणार्या अधिकार्यांची मात्र पोलखोल होईल, हे मात्र नक्की.