आयसीसीनं रिलिज केलं स्पर्धेचं अधिकृत गाणं
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
ग्रॅमी पुरस्कार विजेते कलाकार सीन पॉल आणि सुपरस्टार केस यांनी आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 साठी आऊट ऑफ धिस वर्ल्ड हे अँथम रिलिज केलं आहे. स्पर्धा सुरू होण्याच्या 30 दिवस आधी हे अधिकृत गाणं रिलिज करण्यात आलं. मायकेल टॅनो मोंटानो यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत संगीत व्हिडिओसह लाँच करण्यात आलंय.
या गाण्यामध्ये आठ वेळचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता उसेन बोल्ट, वेस्ट इंडिजचा क्रिकेट आयकॉन ख्रिस गेल, शिवनारायण चंद्रपॉल, अमेरिकेचा गोलंदाज अली खान आणि स्टेफनी टेलर या खेळातील काही मोठ्या नावांचा समावेश आहे. रिलिजच्या वेळी ग्रॅमी पुरस्कार विजेते सीन पॉल म्हणाले, माझा नेहमीच विश्वास राहिला आहे की, क्रिकेट प्रमाणेच संगीतातही लोकांना एकत्र आणण्याची शक्ती आहे. हे गाणं सकारात्मक उर्जा आणि कॅरिबियन अभिमानाबद्दल आहे.
सोका सुपरस्टार केस म्हणाले, क्रिकेट हा नेहमीच कॅरिबियन संस्कृतीचा एक प्रमुख भाग राहिला आहे. म्हणून टी 20 विश्वचषकासाठी अधिकृत गीत लिहिणं आणि रेकॉर्ड करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. ज्यांच्या क्रिएटिव्ह इनपुटनं हे गीत प्रेरित आहे, त्या संपूर्ण क्रूचं मी अभिनंदर करू इच्छितो. लोकांना एकतेची भावना अनुभवण्यासाठी हे एक वास्तविक गीत आहे.
टी विश्वचषकाचा उत्साह सध्या शिगेला पोहचला आहे. आजपासून निवडक सामन्यांसाठीची अतिरिक्त तिकिटं अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जातील. याशिवाय आजपासून वेस्ट इंडिडमध्ये टी विश्वचषक स्पर्धेसाठी तिकीट बॉक्स ऑफिस देखील उघडले जाईल. यामध्ये अँटिग्वा आणि बार्बुडा, बार्बाडोस, गयाना, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो या ठिकाणांचा समावेश आहे.