पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

पाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका व्यक्तीकडून 500 रुपयांच्या 41 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी प्रवीण धर्माजी पाटील (52) याला अटक करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या जप्त केलेल्या बनावट नोटांची एकूण दर्शनी किंमत 20 हजार 500 रुपये आहे. दरम्यान, आरोपी प्रवीण पाटील याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीच्या कालावधीत बनावट नोटांबाबत अधिक तपास करण्यात येणार असून, या नोटा आरोपीकडे कुठून आल्या आणि त्या प्रकरणाशी संबंधित अन्य काही बाबी आहेत का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, एकाच व्यक्तीकडून 500 रुपयांच्या 41 बनावट नोटा मिळून आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलीस तपासातून या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे करीत असून, तपासिक अधिकारी सपोनि संदीप पाटील पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version