कोकण शिक्षक मतदार संघाची मतमोजणी सुरू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाल्यानंतर आज गुरुवार दि. 2 सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत सदर मतमोजणी सुरू झाली आहे.

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील 27 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली. यासाठी एकूण 10,101 मतदार मतदानास पात्र होते. त्यामध्ये 4355 पुरुष तर 5746 महिला मतदारांचा समावेश होता. त्यामधून एकूण 9450 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.जिल्ह्यात एकूण सरासरी 93.56 टक्के मतदान झाले.

या निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील,भाजपचे ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांच्यासह अन्य आठजण रिंगणात आहेत. दरम्यान रायगडात एकूण 93.56 टक्के मतदान झाले. मतदानानंतर सर्व मतपेटया पोलिस बंदोबस्तासह आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर 24, पामबीच रोड, नेरुळ, नवी मुंबई येथे स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात आल्या.

गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून आगरी कोळी संस्कृती भवन येथे मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे.

कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक अपडेट:
*कोकण मतदार संघासाठी एकूण 98 मतदान केंद्रे होती.
*आतापर्यंत मतपेट्या उघडण्याच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत.
*तिसऱ्या फेरीत मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत.

Exit mobile version