रायगडमध्ये मतमोजणीला सुरुवात

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड लोकसभा मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि.4) सकाळी साडेआठ वाजता मतमोजणी सुरु करण्यात आली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्याचे काम सुरु केले आहे.

मात्र, ही मोजणी अर्धा तास उशीरा सुरू झाल्याची माहिती सुत्रांकडून उपलब्ध होत आहे. या मतमोजणीत गीते आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. या मोजणीनंतर इव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, अलिबाग स्थानक ते नेहुली क्रीडा संकुलपर्यंत पोलीस तैनात केले आहेत. वाहतूक पोलीसांचा बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रात जाणाऱ्यांची पोलीसांमार्फत कसून तपासणी केली जात आहे.

Exit mobile version