। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांचे निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकांचा निकाल उद्या 3 डिसेंबर रोजी होणार होता. मात्र, आता हा निकाल लांबणीवर पडला असून 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांचा कौल कोणाकडे जाईल, यासाठी उमेदवारांसह मतदारांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यातील सर्वच पालिका निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने घेतला आहे.







