म्हसळा तालुक्यात खैराची बेसुमार तोड

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यात खैराच्या लाकडाची बेसुमारपणे आणि चोरट्या पद्धतीने तोड सुरु आहे. यामुळे ठेकेदारांनी जंगले नष्ट करण्याचा ठेकाच घेतलाय की काय,अशी विचारणा आता सर्व स्तरातून होत आहे.

तालुक्यात एकूण साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर वनविभागाचे क्षेत्र आहे, तेवढ्याच क्षेत्रात खाजगी वनक्षेत्र आहे. या सर्व क्षेत्रांत फार जुनी खैराची लागवड होती. त्याचीच आता बेसुमारपणे तोड केली जात आहे. या चोरट्या तोडीला आळा घालण्यासाठी परिक्षेत्र वनाधिकारी संजय पांढरकामे यांनी कंबर कसली आहे. शुक्रवारी वनपाल मांदाटणे दिपक शिंदे,वनरक्षक खामगाव प्रियंका चव्हाण वनरक्षक अमोल सोनार यांच्या पथकाने कणघर फाटा येथे महिंद्रा पिकअपमधून होणारा खैराची वाहतूक पकडली. त्यामधून खैर सोलीव नग 146 घमी 0.727 सरकारी किंमत 6309 जप्त करून देहेन विक्रीआगार येथे जमा केला.तसेच वाहतुकीचा टेम्पोही जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक फरान दाऊद चिलवान रा.लिपणीवावे याला न्यायालय श्रीवर्धन येथे हजर करण्यात आले. एक दिवस पोलीस कोठडी दिली.

Exit mobile version