अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्या याचिकेच्या सुनावणीवर कोर्टाचा नकार!

महाविकास आघाडीची दोन मत पाण्यात
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण उथलापुथल झाली असताना दुसरीकडे महाविकास आघाडीची हक्काची दोन मतं रद्द होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. ही दोन मतं म्हणजे अर्थात सध्या तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक आणि आमदार अनिल देशमुख. आज मतदान करण्यासाठी आधी या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर पोलीस संरक्षणात मतदानासाठी जाण्याची परवानगी मागणारी याचिका त्यांनी केली होती. मात्र, त्यावर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता या दोघांच्या मतदानाची शक्यता धूसर झाली आहे.

सत्र न्यायालयाने एकदा मतदान करण्यास नकार दिलेला असताना पोलीस बंदोबस्तात मतदानासाठी नेण्याचा प्रश्न येतो कुठे? असा प्रश्न करून उच्च न्यायालयाच्या आणखी एका एकलपीठाने नवाब मलिक यांच्या मतदानाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे देशमुख- मलिक यांच्या मतदानाची शक्यता आता धूसर झाली आहे.

Exit mobile version