गोरक्षकांना पोलिसांसमोरच मारहाण

सात जणांवर गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा येथे गोवंश सोडवण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर पोलिसांसमोरच मारहाण करण्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गोरक्ष कैलास रेपाळे, विशाल बिंद, प्रतिक ननावरे, तेजस पाटील यांच्यावर हल्ला कण्यात आल्याने यात काही जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यामध्ये सलमान सजीर पटेल, सफवान सजीर पटेल, अत्ताउल्ला ईस्माईल खानसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कैलास रेपाळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, तळोजा गावाच्या हद्दीमध्ये सलमान सजीर पटेल, सफवान सजीर पटेल आणि इतर हे मोहरम सणानिमित्त त्यांच्या राहत्या घरी मटण दुकानामध्ये गोवंशीय जनावराची कत्तल करून मटण विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तळोजा पोलिसांना सदरची माहिती देऊन पोलिसांच्या सहाय्याने उपरोक्त मटण दुकानांमध्ये छापा टाकला असता, काही जनावरे बिना पाण्याची, तसेच चार्‍याची सोय न करता क्रूरतापूर्वक आखूडपणे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवली होती. तेथे काही इसम गोवंशीय प्राण्याची कत्तल केलेले मांस विक्री करीत होते. या इसमाने संबंधित गोरक्षकांवर पोलिसांच्या समोर मारहाण केली.

Exit mobile version