सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल

| मुंबई | प्रतिनिधी |

सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्याजागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे. अशातच राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सीपी राधाकृष्णन दोन वेळा खासदार हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. लहान वयातच ते भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते. यावेळी त्यांचे वय 17.5 वर्ष होते. सीपी राधाकृष्णन हे देखील दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. 1998 आणि 1999 च्या सार्वत्रिक निवडणुका त्यांनी भाजपच्या तिकिटावर जिंकल्या. पण 2004, 2012 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.

अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या
देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणूम सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
जिष्णू देव वर्मा (तेलंगणाचे राज्यपाल), ओम प्रकाश माथूर (सिक्कीम), संतोष कुमार गंगवार (झारखंड), रामेन डेका (छत्तीसगड), सी.एच. विजयशंकर (मेघालय), सी. पी. राधाकृष्णन (महाराष्ट्र), आसामचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती तसेच चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.
Exit mobile version