ज्ञानगंगा संस्थेची निर्मिती शिक्षण पूरक; चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
समाजसेवेच्या ध्यासापोटीच ज्ञानगंगा ट्रस्टची निर्मिती झाली असून उच्च शिक्षण देण्याच्या तुलनेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवून घेणे, हे अधिक कष्टाचे काम आहे.या संस्थेची निर्मिती ही शिक्षण पुरकच झाली असल्याचे प्रशंसोद्गार पीएनपी शिक्षण संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी काढले.
येथील पीएनपी नाट्यगृहाच्या भव्य सभागृहात ज्ञानगंगा विद्यार्थी शिक्षक कल्याणकारी सामाजिक संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.यावेळी त्यांनी ट्रस्टसाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष वैभव पिंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या हिताचे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
शिक्षक नेते आणि ट्रस्टचे सल्लागार प्रमोद भोपी यांनी शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक अशा विविध समित्या स्थापन करुन याद्वारे गरजवंतापर्यंत सर्व प्रकारची मदत करण्याचा दृढ निश्‍चय व्यक्त केला. यावेळी अलिबाग पंचायत समितीचे वरिष्ठ विस्तार अधिकारी कृष्णा पिंगळा यांनी ट्रस्टला शुभेच्छा देताना, शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासही सदर संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असे सूतोवाच केले.
यावेळी ट्रस्टच्या निर्मितीमागील हेतू, भूमिका, जमाखर्च , आजीवन सभासद यादी वगैरे बाबी ट्रस्टचे सचिव सुबोध पाटील यांच्या कल्पनेतून प्रदर्शित करण्यात आल्या. सदर सभेस खूप मोठ्या संख्येने शिक्षक सभासद उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये उपाध्यक्ष प्रतिभा पाटील, प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, शिक्षकनेते नरेंद्र गुरव, नित्यनाथ म्हात्रे, दयानंद अंजर्लेकर, उमेश ठाकूर, अनिल नाईक, सुनील पाटील, जयवंत वाणी,रवींद्र थळे,विनायक भोनकर, मनिषा अंजर्लेकर, प्रवीण पाटील, जितेंद्र पाटील, सुभाष मोकल, महेश कवळे, विलास पाटील, विजय गुरव, दीपक पाटील, दिलीप झावरे, निलेश तुरे, केंद्रप्रमुख सुरेंद्र पाटील, सचिन कांबळे,निलेश वारगे , संजय पोईलकर,संतोष जाधव, रवींद्र साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
या दिमाखदार कार्यक्रमात बळीराम पाटील यांच्या सुश्राव्य ईशस्तवन आणि स्वागतगीताने सारे सभागृह मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार अजित हरवडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद भोपी यांनी केले.

Exit mobile version