मराठी माणसाच्या प्रखल लढ्यातून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी स्वाभिमान आणि अस्मितेचा प्रखर असा संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला गेला, त्यासाठी मराठी माणसाचे अश्रू आणि रक्त सांडले गेले त्यातूनच निर्माण झालेली संयुक्त महाराष्ट्राची सुंदर फुले आजच्या पिढीला वेचता आली.असे प्रशंसोद्रार ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांनी काढले.

आचार्य अत्रे स्मारक समिती आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबइच्यावतीने अत्रे यांच्या125 व्या जयंती निमित्त वरळी नाका येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा ऍड आरती सदावर्ते-पुरंदरे, नगरसेवक अरविंद भोसले, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे उपस्थित राहणार होते. कुटुंब रंगलय काव्यातचे प्रा विसुभाऊ बापट, वृत्तनिवेदक विजय कदम, डॉ रवींद्र आवटी, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक विजय ना कदम, राजन देसाई, श्रीकांत मयेकर, उद्योजक अमर तेंडुलकर, कुमुदिनी बोराडे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अत्रे भक्त सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आपल्याला आचार्य अत्रे आणि त्यांच्या समवेत असलेल्या समकालीन नेतृत्वाच्या त्यागातून आणि संघर्षातून मिळाली आहेय. अत्रे यांच्या जयंतीचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. शासनासह प्रत्येक मराठी जणांनी वर्षभर अत्रेंचे स्मरण करणे आपले सर्वांचे उत्तरदायित्व आहे.

प्रा डॉ उदय निरगुडकर
Exit mobile version