रोटरीच्या उपक्रमाला कर्जतकरांचा प्रतिसाद

मराठी कलावंतांनी उडविली धमाल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर अनेक उपक्रम रोटरी क्लबकडून राबविण्यात येतात. निधी संकलन करण्यासाठी मराठी कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, रोटरी क्लबच्या या उपक्रमाला कर्जतकरांनी उदंड प्रतिसाद दिला. रोटरी क्लबकडून कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक योजना तसेच आदिवासी भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करून मदत केली जाते. तर, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लहान बाळासाठी बेबी वॉर्मस भेट देणे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शौचालय बांधून देणे, आरोग्य शिबिरे, डिजिटल शाळांची निर्मिती आदींसह किशोर वयीन मुलींसाठी मार्गदर्शन स्त्री समानता कार्यक्रम राबविले गेले आहे. साधारण वेगेवगेळे 35 उपक्रम राबविणार्‍या रोटरी क्लबसाठी अर्थसहाय्य ही महत्त्वाची बाब असल्याने मराठी तारका आणि कलावंत यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मराठी कलावंतांकडून साजर्‍या झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात इंडीयन आयडॉल उपविजेता जगदीश चव्हाण, अभिनेत्री ईशा केसकर, महाराष्ट्र हास्यसम्राट कलावंत हेमंत पाटील, कुणाल मेश्राम आणि लावणी कलावंत आकांशा कदम यांनी कार्यक्रमात धमाल उडवून देत सहभागी कलाकारांनी आपल्या नृत्याविष्कार तसेच हास्य कलाकारांनी प्रेक्षकांना हसवून धमाल उडविली. या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन प्रदीप गोगटे यांनी केले होते.

या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, रोटरीचे असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अविनाश कोळी, नगरसेवक बळवंत घुमरे, स्वीकृत नगरसेवक संकेत भासे, हेमंत ठाणगे, भाजप युवक कार्यकर्ते किरण ठाकरे, बजरंग दलाचे साईनाथ श्रीखंडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांचे रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश श्रीखंडे यांनी स्वागत केले. यावेळी रोटरीचे खजिनदार अरविंद जैन, ज्येष्ठ संचालक डॉ. प्रेमचंद जैन, दिपचंद जैन, जितेंद्र ओसवाल, सचिन ओसवाल, योगेश राठी, अभिषेक सर्वे, सुनील सोनी, हुसेन जमाली, रामदास घरत, जिनेंद्र परमार, नंदन भडसावले, डॉ. आदित्य जंगम, डॉ. बी.एल. पाटील, सुशांत ठकेकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version