स्पर्धेत महिलांचा सहभाग कौतुकास्पद
। रायगड । प्रतिनिधी ।
चुल आणि मुल या विश्वातून बाहेर पडत महिला आपले कर्तृत्व विविध क्षेत्रात सिद्ध करित आहेत. महिला चषक स्पर्धेत महिलांचा सहभाग कौतुकास्पद आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकार मित्र असो.चे विविध उपक्रम नक्कीच प्रेरणादायी असतात. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर झालेला हा ‘महिला चषक’ अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार मोहिनी पाटील यांनी काढले आहेत. पनवेल येथील कर्नाळा स्पोर्टस अॅकॅडमी येथे श्री. प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट आणि पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे महिला चषक क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. यावेळी त्या बोलत होत्या.
सकाळपासून सुरु झालेल्या या स्पर्धा फलंदाज अन् गोलंदाजांच्या उत्साहाने उत्तरोत्तर रंगत गेल्या. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी झाले होते. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत महिला चषकावर आपले नाव कोरले आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या संघाने द्वितीय तर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण मोहिनी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पनवेल शहरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे, कामोठेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विमल बिडवे, पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, डॉ. पल्लवी पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक गिते, डॉ. प्रमोद पाटील, जीवन कोंडीलकर, अनिल बहिरा व नगरसेविका प्रीती म्हात्रे आदी प्रमुख पाहुणे होते.
स्पर्धेतील सहभागी संघ
पनवेल उपजिल्हा रुग्णालय: ज्योती गुरव, पुनम वाडकर, सुरेखा तपकिरे, वृषाली वायरे, लक्ष्मी नागापुरे, बरखा गौतम, रेश्मा सावंत, शर्मिला शेडगे, पिंकी येलवे, स्वाती शिंदे, सारिकामानकामे, सुनंदा दांडेकर, हर्षदा पाटणकर, प्रभा पाटील, नेहा चव्हाण.
हार्मोनी स्पोर्टस क्लब : गुड्डी, अपर्णा, ज्योती ठाकूर, चैताली, शितल, रितीका, ज्योती मेहरा, अस्मीता.
गोदरेज टायटन्स: खुशी घोष, अश्विनी भोसले, श्रीती सिंग, अनुश्री खेडवाल, राजश्री मालो, तेजस्वी घनवट, जमुना क्रीश्ना, पूजा चिंडालीया, सीमा शेठ, शितल सोनवणे, शिल्पा चंदाने.
अष्टविनायक फेज 2: रेणूका, शिल्पा, देवश्री, सपना, परुल, रंजना, शमा.
गेम चेंजर: मानसी बांगर, सुखदा तेरे, संगीता जाधव, जयश्री परगवकर, पायल घोरमारे, स्मीता शर्मा, अर्चना सिंग, राजश्री कोल्हे.
कामोठे पोलीस ठाणे: दिपा पवार, अनुराधा कोळी, श्रीवंता सुर्यवंशी, दिपाली वाघचौरे, सुप्रिया कदम, संजुला मोहिते, प्रिया मोरे, उषा कोरडे, सुप्रिया सरोदे.
पनवेल शहर पोलीस स्टेशन: साधना पवार, सुशीला सवार, देवांगी म्हात्रे, ज्योती कांहडळ, वर्षा पाटील, मीरा आंबेकर, इंदू भोईर, तेजस्विनी काशीद.