एमसीए आयोजित क्रिकेट स्पर्धा

रायगडच्या संघांचा मोठा विजय

| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चौदा वर्षाखालील आंतरजिल्हा दोन दिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा सलामीचा फलंदाज आरव बरळ व मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू देव सिंग यांनी दमदार फलंदाजी करत स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शतके झळकावत रायगडच्या संघाला मोठा विजय मिळवून दिला आहे.

पुणे येथील सी.पी मैदानावर रायगड विरुद्ध दक्षिण विभागाचा ग्रुपमधील पहिला सामना खेळण्यात आला. त्यामध्ये रायगडच्या संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत एक डाव व 157 धावाने दक्षिण विभागाच्या संघावार विजय मिळवला आहे. रायगडच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावत 330 धावसंख्या उभारली, सलामीवीर फलंदाज आरव बरळ यांनी धुवाधार फलंदाजी करत 21 चौकार व 2 षटकार ठोकत 155 धावा काढल्या तर दुसऱ्या बाजूने मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू देव सिंग यांनी 16 चौकराच्या साहाय्याने 102 धावा केल्या. 330 धावसंख्येवर रायगडच्या संघाने डाव घोषित केला. प्रतिउत्तर देताना दक्षिण विभागाच्या संघांचा डाव 113 धावसंख्येवरआटोपला, रायगडकडून अर्शद अली, विराज थोरात, प्रज्वल गोवारी यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. फोलोऑन घेऊन पुनः फलंदाजीला आलेल्या दक्षिण विभागाचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 60 धावसंख्येवर गारद झाला, रायगड कडून देव सिंग यांनी सर्वाधिक 5 विराज थोरात यांनी 3 तर अर्शद अली यांनी 2 फलंदाजाना तांबूत धाडले. रायगडच्या संघाने स्पर्धेतील पहिला सामना एक डाव व 157 धावानी जिंकत स्पर्धेला दमदार सुरुवात केली आहे. अष्टपैल्लू खेळाडू देव सिंग याचे प्रशिक्षक सागर कांबळे व आरव बरळ याचे प्रशिक्षक नयन कट्टा व स्वप्नील कदम यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे. संघांनी केलेल्या सुरेख कामगिरीवर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version