झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धा

तनिषा शर्माची सुरेख गोलंदाजी प्रतीक क्रिकेट अकॅडमी पनवेल साखळी सामन्यात विजयी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.अँड.शिरीष पाटील स्मृतीचषक एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतल्या साखळी सामन्यात प्रतीक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघांनी स्पोर्टीगो क्रिकेट अकॅडमी कळंबोली संघावर ४३ धावांनी विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी पात्रता मिळवली आहे.

प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या पनवेल संघांनी ४० षटकांच्या समाप्ती नंतर २१३ धावा धावफलकावर नोंदवल्या.सलामीचा फलंदाज आर्य म्हात्रेनी २३, ईशान पाठक ३० व पार्थ पवार याांनी ३० धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या २१३ पर्यंत पोचवली, स्पोर्टीगो कडून श्रेयस पवार यांनी ३, दिव्यांश चौधरी व सानुराग शर्मा यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले.प्रतिउत्तरात स्पोर्टीगो संघाकडून युवराज खिल्लारे यांनी सर्वाधिक २९ धावा काढल्या, पनवेल कडून तनिषा शर्मा हिने सुरेख गोलंदाजी करत ४ षटकांमध्ये अवघ्या ११ धावा देत ४ फलंदाज बाद केले तिला दुसऱ्या बाजूने जाईद खान ह्याने साथ देत २ गडी बाद केले स्पोर्टीगो संघांनी सर्व गडी गमावत १७० धावा केल्या, पनवेल संघांनी सामना ४३ धावांनी जिंकला.

उत्कृष्ठ गोलंदाजी करणाऱ्या तनिषा शर्मा हिला सामनावीर, युवराज खिल्लारे स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू तर आर्यन जाधव ह्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे सदस्य, प्रसिद्ध जलदगती गोलंदाज अरुण तारे, अजय टेमकर,किरण चौधरी,विरेंद्र पाठक,नरेंद्र शर्मा, किशोर गोसावी,प्रकाश देसाई,प्रतीक मोहिते, योगेश खंडाळे,संकेश ढोळे, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version