। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महिलेचे अश्लील छायाचित्र काढून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आरोपींनी केला आहे. याशिवाय महिलेच्या इच्छेविरोधात लग्न करुन तिच्यासोबत शारिरिक संबंध आरोपींनी ठेवल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, 24 जुन रोजी दोघांनी एका महिलेचे सोगाव येथून अपहरण करुन तिला डांबून ठेवले होते. त्यानंतर तिला पाण्यातून गुंगीचे औषध देत मारहाण व शारिरिक अत्याचार केले. इतकेच नाही तर तिचे अश्लिल फोटो व व्हिडिओ काढून वारंवार तिला धमकी दिली.
याबाबत तिने आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने महिलेला बदनामी करण्याची तसेच आई-वडील आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देत तब्बल 1 लाख 35 हजारांची रोख तसेच दोन तोळ्याची सोन्याची चैन उकळली. त्यानंतर आरोपीने 6 जुलै 2022 रोजी महिलेच्या इच्छेविरोधात लग्न केले.
अखेर आरोपीच्या जाचाला कंटाळलेल्या पिडित महिलेने घडलेला सर्व प्रकार अलिबाग पोलिसांना सांगितला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.